पहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे.

आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा

कृतज्ञता हा असा गुणधर्म आहे की जो परमेश्वराला सगळ्यात जास्त आवडतो.

मी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते

जेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन

मनात भक्तिभाव नसताना नुसत्या हाताने कर्मकांडाची मी केलेली कवायत माझ्या परमेश्वरापर्यंत कधीच पोहोचत नाही

जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य

माझे आहार, विहार, आचार, विचार कसे आहेत ह्यावरच माझ्यावरील परमेश्वराची कृपा अवलंबून असते

परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही

परमेश्वराला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही
