तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.

इतर काहीही खरी शोकान्तिका नाही, तर व्यर्थ जाणे हीच खरी शोकान्तिका आहे.

काळ ही या जगातील सर्वांत मूल्यवान गोष्ट आहे. तो वाया घालवू नका.

पदवी तुम्हाला विषयाशी जोडत नाही, अभ्यास तुम्हाला विषयाशी जोडतो.

अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून

यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर गेले की इतर लोक न्यून शोधणारच

व्यवहार घट्ट सांभाळलेला असेल, तरच तुमचे अध्यात्म तुमचा उत्कर्ष करते

ह्या जगात लाचार होऊन काहीही मिळत नाही आणि मिळाले तरी ते कधीच टिकत नाही.

‘प्रथम पृथ्वी नीट सपाट व स्वच्छ करून मग तेथे आपल्या सोयीनुसार नद्या, पर्वत बांधावेत व मग आपले नगर बसवावे’ ही कल्पना मूर्खपणाची आहे
