काही माणसे थोडसे जरी संकट आले तरी घाबरून जातात, तर काही माणसे कितीही मोठे संकट आले तरी तोंड देतात; ही संकटांना न डगमगता, न घाबरता, न वाकता, न मोडता तोंड देणारी माणसे म्हणजे भक्त
परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही. प्रत्येकाची रांग परमात्म्याकडे सद्गुरुकडे वेगवेगळीच आहे. मला दुसर्याच्या रांगेत घुसायचे नाही व माझ्या रांगेत कोणीही घुसू शकत नाही. माझ्यासाठी जे काही करायचे आहे ते तो परमात्माच करू शकतो.