परिपुर्णता हा एक भ्रम आहे. त्यास विसरा. केवळ भगवन्तच परिपुर्ण आहे

अहंकार तुम्हाला हा विचार करायला भाग पाडतो की तुम्ही भगवन्तापेक्षा मोठे आहात.

तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.

इतर काहीही खरी शोकान्तिका नाही, तर व्यर्थ जाणे हीच खरी शोकान्तिका आहे.

काळ ही या जगातील सर्वांत मूल्यवान गोष्ट आहे. तो वाया घालवू नका.

पदवी तुम्हाला विषयाशी जोडत नाही, अभ्यास तुम्हाला विषयाशी जोडतो.

एड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना

निरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद

सोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे
