डॉक्टर श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू) यांची प्रवचने म्हणजे भक्तिशील मूल्यांचामहासागरच आहे.

या अथांग महासागरात आनन्दाने विहार करताना त्यातून सद्विचारांचे काही मोती आमच्या म्हणजेच त्यांच्या श्रद्धावान मित्रांच्या ओंजळीत आपोआप सहजपणे प्रेमाने आले.

सर्वच श्रद्धावानांना या आनन्दात सहभागी करून घेता यावे, म्हणून आमचा हा एक सप्रेम प्रयास आहे.

सद्विचारांचे हे मोती जर आपण आपल्या जीवनात उतरवू शकलो, तर आपले जीवन समृद्ध होईलच यात शंका नाही.