कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे

मी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते

जेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन

भीतीमुळे माझी प्रगती थांबते. तर धाकामुळे माझी प्रगती अधिकाधिक व्हायला लागते

भीती हा मानवाचा सर्वात मोठा शत्रु आहे. तर धाक हा मानवाचा सर्वात मोठा मित्र आहे

मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि देशसेवा हा मोक्षाचाच मार्ग आहे

तृप्त राहणे म्हणजे माझे ध्येय कमी प्रमाणात ठेवणे असे नव्हे

कर्मफळाची म्हणजेच भविष्यकाळाची चिंता न करता

मनात भक्तिभाव नसताना नुसत्या हाताने कर्मकांडाची मी केलेली कवायत माझ्या परमेश्वरापर्यंत कधीच पोहोचत नाही
